Ad will apear here
Next
रेटिनोब्लास्टोमा जागरूकता सप्ताहानिमित्त मार्गदर्शन
एच. व्ही. देसाई आय हॉस्पिटलचा उपक्रम
जागतिक रेटिनोब्लास्टोमा जागरूकता सप्ताहानिमित्त एच. व्ही. देसाई आय हॉस्पिटलमध्ये आयोजित  कार्यक्रमात सहभागी झालेले डॉक्टर्स, रुग्ण व पालक.

पुणे : जागतिक रेटिनोब्लास्टोमा जागरूकता सप्ताहाचे औचित्य साधून १२ ते १८ मे दरम्यान,एच. व्ही. देसाई आय हॉस्पिटलमध्ये एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी रेटिनोब्लास्टोमावर उपचार झालेले रूग्ण आणि त्यांचे पालक उपस्थित होते. रेटिनोब्लास्टोमा हा लहान मुलांना होणारा डोळ्यांचा कर्करोग असून, यावर उपचार करता येतात.

या वेळी पुना ब्लाइंड मेन्स असोसिएशनचे (पीबीएमए) अध्यक्ष नितीन देसाई, व्यवस्थापन समितीचे सदस्य मीना देसाई आणि रजनीकांत जेठा, अध्यक्ष राजेश शहा, मुख्य वैद्यकीय संचालक कर्नल डॉ. मदन देशपांडे व एच. व्ही. देसाई आय हॉस्पिटलचे अध्यक्ष परवेझ बिलिमोरिया उपस्थित होते.

एच. व्ही. देसाई आय हॉस्पिटलमधील ऑप्थॅल्मिक प्लॅस्टिक सर्जरी व ऑक्युलर आँकोलॉजी विभागाचे प्रमुख व वैद्यकीय संचालक डॉ. राहुल देशपांडे यांनी प्रास्ताविक केले. ऑप्थॅल्मिक प्लॅस्टिक सर्जरी व ऑक्युलर आँकोलॉजी कन्सल्टंट डॉ. सोनल चौगुले यांनी रेटिनोब्लास्टोमा या डोळ्याच्या कर्करोगाविषयी माहिती दिली. 

सह्याद्री हॉस्पिटलमधील मेडिकल आँकोलॉजिस्ट डॉ. तुषार पाटील यांनी रेटिनोब्लास्टोमाग्रस्त लहान मुलांवर उपचार करताना बहुआयामी प्रयत्नांचे महत्त्व आणि सिस्टिॅमिक केमोथेरपी याबाबत माहिती दिली. एच.व्ही.देसाई आय हॉस्पिटलमधील उपसंचालक डॉ. सुचेता कुलकर्णी यांनी लवकर होणाऱ्या निदानाचे महत्त्व आणि उपचारानंतर घ्यावयाची काळजी यावर सादरीकरण केले. डॉ. कर्नल मदन देशपांडे यांनी उपचार घेतलेल्या मुलांचे आणि पालकांचे अनुभव सांगितले. या वेळी बेंगळुरू येथील स्वयंसेवी संस्था इक्षा फाउंडेशनचे संस्थापक अरविंद शेषाद्री, एच. व्ही. देसाई आय हॉस्पिटलमधील वैद्यकीय व्यवस्थापक कर्नल डॉ. व्ही. पी. अंदुरकर, पेडियाट्रिशन कर्नल डॉ. कुलकर्णी, अॅॅनेस्थेशिया विभागामधील डॉ. रोहितकुमार, वैद्यकीय संचालक डॉ. कुलदीप डोळे आणि सहकारी आदी उपस्थित होते.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/VZSLCA
 Congratulations to team Ruby hall clinic ! Ruby hall clinic is always one step ahead to adapt new technology and to provide it to our patients.
What is the approximate cost of such robotic surgery?
All the best for future plans.
Similar Posts
काचबिंदूमुळे होणारे अंधत्व रोखण्यासाठी नियमित तपासणी आवश्यक पुणे : ‘काचबिंदूवर वेळीच उपचार न केल्यास अंधत्वाची जोखीम निर्माण होऊ शकते आणि म्हणून आपल्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी नियमित तपासणी करणे गरजेचे आहे,’ असे मत एच. व्ही. देसाई आय हॉस्पिटलमधील काचबिंदू सल्लागार डॉ. विद्या चेलेरकर यांनी व्यक्त केले.
पुण्यातील देसाई नेत्र रुग्णालयाचा इंग्लंडच्या राणीकडून होणार सन्मान पुणे : लहान बाळांना कायमच्या अंधत्वापासून वाचवण्यासाठी पुण्यातील एच. व्ही. देसाई नेत्र रुग्णालयाने केलेल्या कामाची दखल इंग्लंडच्या राणीने घेतली असून, लंडनच्या बकिंगहॅम पॅलेसमध्ये २९ ऑक्टोबर २०१९ रोजी होणाऱ्या विशेष समारंभात या रुग्णालयाचा सन्मान होणार आहे. राणी एलिझाबेथ यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या सोहळ्यात डॉ
‘योग्य सावधगिरीमुळे उन्हाळ्यात नेत्र रोगांपासून बचाव शक्य’ पुणे : कडक ऊन आणि दिवसेंदिवस वाढत जाणारे तापमान यांचा डोळ्यांवर प्रभाव पडण्याची शक्यता असते. असे असले तरी सर्वांनी सावधगिरी बाळगल्यास उन्हाच्या तडाख्यापासून स्वत:च्या डोळ्यांचा बचाव करणे सहज शक्य असल्याची माहिती एच. व्ही. देसाई आय हॉस्पिटलच्या कॉर्निया व कॅटरॅक्ट कन्सल्टंट डॉ. सीमा जगदाळे यांनी दिली
सह्याद्री हॉस्पिटलतर्फे प्रगत कॅन्सर केअर सेंटर सुरू पुणे : ‘सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या वतीने हडपसर येथे प्रगत कॅन्सर केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. या सेंटरमुळे कर्करोगाशी संबंधित सर्व अद्ययावत वैद्यकीय सेवा एकाच छताखाली उपलब्ध होतील,’ अशी माहिती सह्याद्री हॉस्पिटल्सचे अध्यक्ष व न्युरोसर्जन डॉ. चारूदत्त आपटे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी आँकोलॉजी विभागाच्या संचालिका डॉ

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language